बंद

    तक्रार निवारण

    कार्यक्रमाचा परिचय:

    राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानाची स्‍थापना देशातील आरोग्‍य विषयक सोयी सुविधा व त्‍या संबंधित आरोग्‍याचा दर्जा सुधारण्‍यासाठी करण्‍यात आलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्‍य सोयी सुविधाच्‍या दृष्‍टीकोनातून सदर योजना राबविण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्र राज्‍यात राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानाची स्‍थापना सन २००५ मध्‍ये राज्‍य आरोग्‍य सोसायटीद्वारे करण्‍यात आलेली आहे. राज्‍यातील ग्रामीण भागामध्‍येराष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानांतर्गत आरोग्‍य विषयक विविध योजना/कार्यक्रम मंजुर कृती आराखडयानुसार राबविले आहे. कोणत्याही प्रशासनाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष एक महत्वाचा भाग आहे. तक्रार निवारण कक्षाशिवाय प्रशासकिय कार्य हे कार्यक्षम व परिणामकारक होऊ शकत नाही. प्रशासकिय व योजनांतर्गत कामकाजामध्ये येत असलेल्या विविध अडचणी, समस्यांबाबतची तक्रार रितसर सोडविण्याच्या दृष्टीकोनातून तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर तक्रार निवारण कक्षामध्ये केलेली तक्रारींची सखोल चौकशी करुन तक्रारीचे निवारण केले जाते. त्यामुळे अभियानांतर्गत तक्रार निवारण कक्षाची भूमिका महत्वाची ठरत आहे.

    तक्रार निवारण कक्षाच्‍या स्‍थापनेबाबत

    • राज्‍य आरोग्‍य सोसायटी अंतर्गत विविध योजना चांगल्‍या प्रकारे राबविण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून तसेच अभियानांतर्गत येणा-या तक्रारी व समस्‍यांचे निराकरण करण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍यस्‍तरावर सन २००९ या आर्थिक वर्षात राज्‍यसतरीय तक्रार निवारण कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.
    • सन २०१०-११ या आर्थिकवर्षात अभियानांतर्गत येणा-या तक्रारी व समस्‍यांची त्‍वरीत निराकरण करण्‍याच्‍या उद्देशाने सर्व उपसंचालक,आरोग्‍य सेवा यांच्‍या अधीन ८ विभागीय स्‍तरावर देखील तक्रार निवारण कक्ष/समितीची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे.
    • सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात अभियानांतर्गत सर्व जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण समिती/कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.
    • तक्रार निवारण कक्षास प्राप्‍त झालेल्‍या तक्रारी तात्‍काळ निकाली काढून योग्‍य न्‍याय देणे तसेच अभियानांतर्गत राबविण्‍यात येणारे सर्व कार्यक्रमाची योग्‍यप्रकारे अंमलबजावणी करण्‍याचे मुख्‍य उद्दि‍ष्‍ट आहे.

    प्राप्‍त तक्रारीचे प्रकार

    • खरेदी / निधी अनियमितता / प्रशासकीय अनियमितता, नियुक्ती आणि पुनर्नियुक्ती, फसवणूक, छळ, कंञाटी कर्मचारी वेतन समस्या, रुग्‍ण सेवा नाकारणे आणि इतर.

    ऑर्गनोग्राम:

    तक्रार प्रतिमा

    ध्येय:

    तक्रारींचे पद्धतशीर आणि वेळेत निवारण सुनिश्चित करण्यात मदत करणे.

    उद्दिष्टे:

    1. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि नागरीकांच्‍या समाधानासाठी समर्पित एक मजबूत, कार्यक्षम आणि प्रभावी तक्रार निवारण प्रणाली असणे.
    2. समाजाच्या आरोग्यविषयक गरजांना अधिक प्रतिसाद देणारी आरोग्य यंत्रणा तयार करणे.
    3. नागरीकांना त्यांच्या तक्रारी सक्षम प्राधिका-यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
    4. तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्राप्‍त तक्रारीचे निराकरण करण्‍याचे प्रयत्‍न करणे.
    5. सामान्‍य जनतेने दाखल केलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे रुग्‍णालयाचे कामकाज सुधारण्‍यासाठी त्‍यांच्‍या सुचनांची अमंलबजावणी करता यावी याकरीता सेवा दात्‍यांना त्‍यांचा प्रोत्साहन प्राप्‍त होईल.
    6. तक्रारींचे विश्लेषण करणे आणि सरकारी आरोग्य संस्थांच्या कार्यपद्धतीत योग्य ते बदल सुचवणे आणि संस्थांच्या कामगिरीतील सुधारणांवर लक्ष ठेवणे.

    दृष्टी आणि ध्येय:

    तक्रार निवारण कक्ष (जीआरसी) कोणत्याही तक्रारदाराने नोंदवलेल्या तक्रारींची तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्याचे निराकरण करणे.

    मागील ५ वर्षांची कामगिरी/आर्थिक माहिती:- मंजूर अर्थसंकल्प आणि खर्च:

    राज्‍यस्‍तरावरील निकाली काढण्‍यात आलेल्‍या तक्रारींचा वर्षानिहाय तपशील –
    अनु. क्र सन प्राप्‍त तक्रारीची एकूण संख्‍या निकाली काढण्‍यात आलेल्‍या तक्रारीची संख्‍या कार्यवाही सुरु असलेल्‍या तक्रारीची संख्‍या
    1 २०१९-२० ४८५ ४८५
    2 २०२०-२१ २४६ २४६
    3 २०२१-२२ १६४ १५५
    4 २०२२-२३ २८१ २४५ ३६
    5 माहे नोव्‍हे. २०२३ २३५ १८८ ४७
    एकूण १४११ १३१९ ९२
    परिमंडळ व जिल्‍हास्‍तरावर निकाली काढण्‍यात आलेल्‍या तक्रारींचा वर्षानिहाय तपशील-
    अनु. क्र सन प्राप्‍त तक्रारीची एकूण संख्‍या निकाली काढण्‍यात आलेल्‍या तक्रारीची संख्‍या कार्यवाही सुरु असलेल्‍या तक्रारीची संख्‍या
    1 २०१९-२० ३७४३ ३७४३
    2 २०२०-२१ १७८९ १७८९
    3 २०२१-२२ ७३६ ७३६
    4 २०२२-२३ १७३५ १७३५
    5 माहे नोव्‍हे. २०२३ १०९४ ८७२ २२२
    एकूण ९०९७ ८८७५ २२२


    फसवणुकीच्या तक्रारीचे परिपत्रक पहा (पीडीएफ- 357 केबी)


    सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार निवारण पत्र पहा (पीडीएफ – 2 एमबी)