माहेर योजना
बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ प्रदेशात पाडयांमध्ये वास्तव्यास असते. आदिवासी पाडयांमध्ये अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाहीत. तसेच पक्के रस्ते असल्यास गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचण्यासाठी सोयस्कर वाहतुक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. हे माता व बाल मृत्यचे प्रमाण वाढण्यास महत्वाचे कारण आहे.
प्रत्येक आदिवासी पाडयास वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करुन आर्थिकदृष्टया अशक्य, दुर्गम आदिवासी भागात खंडीत दुरध्वनी व मोबाईल सेवा या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियनांतर्गत माहेर घर योजना सुरु करण्यात आलेली आहे.
१. उद्दिष्टेः-
सुरक्षित व वैद्यकीय संस्थामध्ये बांळतपण निश्चित करण्यासाठी गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करुन देणे.
२. अंमलबजावणी पध्दतः-
या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली (माहेर घर) बांधण्यात आलेली आहे. माहेर घरामध्ये गर्भवती महिला प्रसूतीपुर्वी चार ते पाच दिवस अगोदर भर्ती करण्यात येते. गर्भवती माहिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते आणि तपासणी दरम्यान गुंतागुंत आढळल्यास तिला जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भीत करण्यात येते.
माहेर घरामध्ये गर्भवती माहिला, तिचे लहान मुल व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. माहेर घरांची देखभाल ठेवण्यासाठी व गर्भवती महिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांना भोजनाची सोय करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत महिला स्वंयसहाय्यता बचत गट किंवा दारिद्रय रेषेखालील कुंटूंबाची निवड करण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या बचत गटाला किंवा दारिद्रय रेषेखालील कुंटुंबाला एका लाभार्थीमागे रु. ५००/- देण्यात येत आहेत.
३. सेवा देणा-या संस्था:-
राज्यात ९ जिल्हयातील ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेर घर बांधण्यात आले आहे. माहेर घर ही योजना ठाणे (४), नाशिक (२), नंदुरबार (९), नांदेड (३), यवतमाळ (२), गोंदिया (१३), चंद्रपूर (७), गडचिरोली (८) व अमरावती (९) इ. कार्यरत आहेत.
४. कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम
- अंमलबजावणी कालावधीः- माहेर घर ही योजना राज्यातील नऊ आदिवासी जिल्हयामध्ये सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे.
- लाभार्थीः- माहेर घरामध्ये गर्भवती महिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
- देण्यात येणारे लाभः- माहेर घरामध्ये गर्भवती महिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. गर्भवती माहिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांना आहाराची सोय महिला स्वंयसहाय्यता बचत गट किंवा दारिद्रय रेषेखालील कुंटूंबामार्फत करण्यात आलेली आहे. माहेर घरांमध्ये खाटा, शौचालय आणि स्नानगृह, धुर विरहीत चुलीसह एक किचन ओटा व गरम पसण्यासाठी खोलीच्या छपरावर सोलर वॉटर सिस्टमची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.
५) कार्यक्रमाची सद्यस्थितीः-
माहेर घर ही योजना राज्यातील नऊ आदिवासी जिल्हयामधील ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येत आहे.
६) निर्देशक निहाय झालेले कार्यः-
सन २०१०-११ या वर्षात ९६९ गरोदर मांतानी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच सन २०११-१२ या वर्षात १,७४४ गरोदर मातानी योजनेचा लाभ घेतलेला आहे. सन २०१२-१३ या वर्षासाठी केंद्र सरकारने या योजनेसाठी रु. ७६ लक्ष अनुदान मंजूर करण्यात आलेले आहेत. १ एप्रिल २०१२ ते ३१ डिंसेबर २०१२ पर्यंत १७८८ गरोदर मांतांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.
|