सुदृढ गाव सुदृढ राष्ट्र
English Website 
 » आशा स्वयंसेविका योजना एक दृष्टीक्षेप
 • आशा स्वयंसेविका योजना एक दृष्टीक्षेप
  प्रस्तावना
  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत “आशा स्वयंसेविका योजना” राबविण्यात येत आहे. आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे. आशा ही गावातील स्थानिक रहिवासी असल्याने व तिला स्थानिक भाषा अवगत असल्याने गावाच्या आरोग्य विषयक अडचणी समजून घेण्यास व नेतृत्व करुन गावपातळीवरील समस्या सोडविण्याकरिता आशा स्वयंसेविकेकडून महत्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्यातील १५ आदिवासी जिल्हे व ३१ बिगर आदिवासी जिल्ह्यांत आशा स्वयंसेविका कार्य करते.

  • आशा स्वयंसेविकेची निवडप्रक्रियाः-
  • आदिवासी क्षेत्रः-
   • आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका किमान आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी व उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात यावे. तिचे वय साधारणतः २० ते ४५ असावे.
   • आदिवासी क्षेत्रात ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ५ आशांची निवड करण्यात येते. त्यापैकी तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून एका आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निवडलेल्या आशा स्वयंसेविकेस नियुक्ती पत्र देण्यात येते.
   • १००० लोकसंख्येस १ या प्रमाणात आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते.
   • आदिवासी क्षेत्रात ९,५२३ आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा देत आहेत.
  • बिगर आदिवासी क्षेत्रः-
   • बिगर आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका किमान १० वी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी व उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात यावे. तिचे वय साधारणतः २५ ते ४५ असावे.
   • बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, वैद्यकिय अधिकारी यांची समिती आशा स्वयंसेविका पदाकरिता प्राप्त अर्जांची छाननी करुन ग्रामसभेत ३ अर्ज सादर करेल व ग्रामसभा ३ अर्जांपैकी एका अर्जदार महिलेची निवड आशा स्वयंसेविका म्हणून करेल. तदनंतर ग्रामसभा सदर प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठवेल. तालुका आरोग्य अधिकारी सदर महिलेस आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती पत्र देईल्.
   • १५०० लोकसंख्येस १ या प्रमाणात आशा स्वयंसेविकांची निवड करण्यात येते.
   • बिगर आदिवासी क्षेत्रात ४९,७६६ आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा देत आहेत.
  • आशा स्वयंसेविकाभूमिका व जबाबदा-याः-
   • आरोग्य संस्थेतील प्रसुतीमध्ये वाढ करणे.
   • मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत
   • मोफत संदर्भ सेवेचा प्रचार
   • कुटुंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप
   • साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला यावर औषधी संचातील औषधांचा वापर
   • माता व बाल आरोग्य विषयी प्रबोधन उदा. प्रसुतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, आहार इत्यादी.
   • जन्म व मृत्यु नोंदणीमध्ये मदत
   • ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य
  •  “आशास्वयंसेविका आधारभूत यंत्रणाः

  आशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणालीस गती येण्याकरिता, कार्याचे मूल्यांकन, व्यवस्थापनाकरिता जिल्हा पातळीवर १ जिल्हा समूह संघटक व आदिवासी क्षेत्रात प्रत्येकी १० आशा स्वयंसेविकेस एका गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर बिगर आदिवासी क्षेत्रात एका प्राथमिक आरोग्य केंद्रास एका गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

   • आदिवासी क्षेत्रात १५ व बिगर आदिवासी क्षेत्रात १८ जिल्हा समूह संघटक कार्यरत आहेत.
   • आदिवासी क्षेत्रात ९२८ व बिगर आदिवासी क्षेत्रात १४२५ गट प्रवर्तक कार्यरत आहेत.
   • जिल्हा समूह संघटक यांना रु. २००/- इतका प्रवास व दैनिक भत्ता व प्रत्यक्ष प्रवास भत्ता अदा करण्यात येतो.
  • “आशा स्वयंसेविका” प्रशिक्षणः-
   • आशा स्वयंसेविकेची नियुक्ती झाल्यानंतर आशा स्वयंसेविकेस प्रशिक्षण पुस्तिका क्र. १ ते ७ चे प्रशिक्षण येते. आशा स्वयंसेविकेला सात दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते व तिला सर्वसमावेशक अशी प्रशिक्षण पुस्तिका देण्यात येते.
   • आशा स्वयंसेविकेची एकुण प्रशिक्षणाचा कालावधी ४३ दिवसाचा ठरविण्यात आलेला आहे.
   • आशा स्वयंसेविकेच्या वेळोवेळी मासिक सभा आयोजित करुन तिला प्रशिक्षण दिले जाते.
   • प्रशिक्षणाचे वेळी तिला प्रवासभत्ता व दैनिक भत्ता रु. १५०/- देण्यात येतो.
   • आशा प्रशिक्षणापूर्वी प्रत्येक जिल्ह्याने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर दिले जाते. तदनंतरच आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणास प्रारंभ केला जातो.

  आशा स्वयंसेविकेस खालीलप्रमाणे कामाचा मोबदला देण्यात येतोः-


  क्र

  कामाचा प्रकार

  निधीची तरतूद

  आशा स्वयंसेविकेस अदा करावयाचा मोबदला

  जननी सुरक्षा योजनंतर्गत गरोदर मातांना संस्थात्मक (प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास (आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात)

  आर.सी.एच.

  आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासी क्षेत्रासाठी रु. ६००/-

  बिगर आदिवासी क्षेत्रासाठी रु. २००/-

  स्त्री शस्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास

  आर.सी.एच.

  रु. १५०/-

  पुरुष शस्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास

  आर.सी.एच.

  रु. २००/-

  क्षयरोग्याला डॉटसचा औषधोपचार

  आर.एन.टि.सी.पी.

  रु. २५०/-

  हिवतापाचा समुळ उपचार

  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

  रु. ५/-

  रु. २०/-

  रु. ५०/-

  कुष्ठरोग औषधोपचार

  एन.एल.ई.पी.

  रु. १००/-

  एन.एल.ई.पी.

  रु. ४००/-

  एन.एल.ई.पी.

  रु. २००/-

  साथरोग उद्रेक नियंत्रण

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. १००/-

  साथरोग नियंत्रण (जलशुष्कता)

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ४०/-

  गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. २०/-

  १०

  एचआयव्हीबाधित मातेची प्रसुती

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ७५०/-

  ११

  प्रसुतीनंर एचआयव्हीबाधित मातेची ६ व्या आठवड्यात, ६ व्या महिन्यात व १८ व्या महिन्यात तपासणी

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ५००/-

  १२

  ग्रामपातळीवरील दरमहा बाह्य संपर्क लसीकरण

  नियमित लसीकरण

  रु. ७५/-

  १३

  बाह्य संपर्क लसीकरण त्रैमासिक सभा (वर्षातून ४ वेळा)

  नियमित लसीकरण

  रु. ७५/-

  १४

  शौचालय बांधकाम

  पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

  रु. ५०/-

  १५

  जन्माची सूचना

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. १०/-

  १६

  जन्माची नोंदणी

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. २५/-

  १७

  ० ते ५ वयोगटातील मृत्यूची सूचना / माहिती

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ७५/-

  १८

  १५ ते ४९ वयोगटातील महिलेच्या मृत्यूची सूचना

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. १००/-

  १९

  १५ ते ४९ वयोगटातील मृत महिला माता असल्यास

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ५००/-

  २०

  वार्षिक लसीकरण

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. १०००/-

  मिशन (फलेक्सीपुल)

  रु. ७५०/-

  २१

  गंभीर आजारी बालकास संदर्भ सेवा (आदिवासी भागात)

  आर.सी.एच. २

  रु. ५०/-

  २२

  सिकलसेल नियंत्रण् कार्यक्रम
  (अमरावती, धुळे, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जळगांव, रायगड)

  सिकलसेल निधी

  प्रती ग्रामसभा रु. ५०/-

  प्रती बैठक रु. ४०/-

  प्रती चाचणी रु. ५/-

  प्रती कार्ड रु. २०/-

  प्रती भेट रु. १५/-

  २३

  मोतिबिंदू शस्त्रक्रिया

  एन.पी.सी.बी.

  रु. ७५/-

  २३

  मोतिबिंदू शस्त्रक्रिया

  एन.पी.सी.बी.

  रु. १००/-

Top  
© Copyright NRHM, Mumbai