सुदृढ गाव सुदृढ राष्ट्र
English Website 
 » सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम

सिकलसेल आजार हा अनुवंशिक व गंभीर स्वरुपाचा असून यामध्ये लाल रक्तपेशी काही परिस्थितीत आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या होतात. साधारण रक्तपेशी, ह्या गोल आकाराच्या असतात आणि त्या रक्तवाहीन्यांमधून शरीराच्या सर्व भागांपर्यंत सहज ऑक्सिजन वाहून नेतात. सिकलसेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहीन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाहीत. त्या घट्ट आणि चिकट होतात. त्यां रक्तवाहिन्यांमध्ये अडकून रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करतात अतिशय वेदना होतात. लाल रक्‍तपेशिंच्‍या नष्‍ट होण्‍यामुळे अॅनिमिया व कावीळ होते.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी सादर केलेल्या जून, २००८ या प्रस्तावानुसार सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राज्यातील १९ जिल्ह्यात सन २००८ पासून टप्प्या टप्प्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत राबविण्यात येत आहे.
पहिला टप्पा (२००७-०८) – ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली
दुसरा टप्पा (२००९-१०) – नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ
तिसरा टप्पा (२०१०-११) – धुळे
चौथा टप्पा (२०११-१२) – जळगाव, नांदेड, अकोला, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद आणि रायगड
पाचवा टप्‍पा (२०१२-१३) – हिंगोली (मा. लोकायुक्‍तांचे आदेश)
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टेः

 • सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करणे
 • लोकांची तपासणी करणे (१ ते ३० वयोगटातील व्‍यक्‍तींची गावनिहाय चाचणी, गरोदर महीला, वाहक व रुग्‍ण यांचे कुटुंबातील इतर व्‍यक्‍ती व सर्व वयोगटातील लक्षणे दिसणा-या व्‍यक्‍ती) तसेच निदान आणि उपचाराबाबतची माहिती लोकांना देणेकरिता स्वयंसेवी संस्थांची नेमणूक करणे.
 • वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र / ग्रा.रु. / जि. रुग्णालयातील निम वैद्यकिय कर्मचारी यांना सोल्युबिलीटी चाचणी, समुपदेशन आणि उपचारासाठी प्रशिक्षित करणे.
 • ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालयांना इलेक्ट्रोफोरेसीस मशिन पुरविणे.
 • प्रा.आ.केंद्र / ग्रा.रु. / जि. रु. / उप जि. रुग्णालयात प्राथमिक चाचणीची (सोल्युबिलीटी चाचणीची) सुविधा उपलब्ध करुन देणे.
 • सोल्युबिलीटी चाचणीमध्ये सकारात्मक आलेल्या व्यक्तींना इलेक्ट्राफोरेसीस चाचणी करण्यासाठी जवळच्या इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी केंद्रांत पाठविणे.
 • सिकलसेल ग्रस्त तसेच वाहक यांचा शोध घेणे.
 • सिकलसेल वाहक व्यक्तींना पिवळे कार्ड आणि सिकलसेल ग्रस्त व्यक्तींना लाल कार्ड व निरोगी व्‍यक्‍तींना पांढरे कार्ड वाटप करणे.
 • ग्रस्त आणि वाहक व्यक्तींना विवाहाबाबत तसेच कुटुंब नियोजनाबाबत व रुग्‍णांना नियमित उपचाराबाबत समुपदेशन करणे.
 • ग्रस्त आणि वाहक व्यक्तींचे लसीकरण करणे.
 • पात्र जोडप्‍यांमधिल गरोदर महिल्‍यांची पहिल्‍या तीन महिन्‍यात सिकलसेलसाठी गर्भजल तपासणी करण्यास तसेच आवश्यकता असल्यास वैद्यकीय गर्भपाता करिता समुपदेशन करणे.
 • ग्रस्त व्यक्तींना गरजेनुसार फॉलीक अँसीडच्या गोळ्या, अँन्टीबायोटीक्स (प्रतिजैविके) तसेच पेनकिलर्सची सोय प्राथमिक आरोग्य / ग्रामीण उपजिल्हा / जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देणे.
 • सिकलसेल ग्रस्त व्यक्तींना विशेषज्ञ उपचारासाठी जिल्‍हा रुग्‍णालयातील डे केअर सेन्‍टर मध्‍ये संदर्भीत करणे.
 • विशेषज्ञांची आवश्‍यकता असल्‍यास टेलिमेडीसन सुविधेचा वापर करणे.

  सिकलसेल आजार नियंञण कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थांची कर्तव्य व जबाबदारी
 • सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करणे.
 • जनतेला सोल्युबिलीटी चाचणीसाठी प्रवृत्त करणे.
 • प्राथमिक चाचणीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाचा रक्तनमुना इलेक्ट्रोफोरेसीस चाचणीसाठी गोळा करणे व तो

इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी केंद्राला देणे.

 • सिकलसेल रुग्ण व वाहक यांचे रजिस्टर ठेवणे.
 • सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांना विवाहाबाबत, कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करणे. सिकलसेल
 • ग्रस्त व्यक्तीला नियमित उपचारासाठी समुपदेशन करणे. 
 • पात्र जोडप्‍यांना सिकलसेलसाठी गर्भजल तपासणीसाठी समुपदेशन करणे.
 • रंगीत कार्डचे वाटप करणे. (रुग्ण – लाल – वाहक – पिवळे, नकारात्मक – पांढरे)
 • सिकलसेल आजारग्रस्त रुग्णांना दरमहा गृह भेटी देणे.
 • स्थानिक भाषेत गरजेनुसार आय.ई.सी. साहित्य तयार करुन वाटप करणे.
 • गरोदर मातांना बाळंतपणाबाबत लवकर नोंदणी व निदान करण्यासाठी समुपदेशन करणे.
 • गावनिहाय सोल्‍युबिलीटी चाचणी करणे.

जिल्हा

स्वयंसेवी संस्थेचे नाव

ठाणे

नवोदय ग्रामीण संस्था, जव्हार, ठाणे

नाशिक

गौरी सामाजिक संस्था, नाशिक

नंदूरबार

जिजाऊ मराठा महिला समाज उन्नती मंडळ, नंदूरबार

गोंदिया

प्रबुध्द विनायकी कल्याणकारी संस्था, तिरोडा, गोंदिया

गडचिरोली

१.आरोग्‍यधाम कुष्‍ठरोग निमुलण संस्‍था, कुरखेडा, गडचिरोली

२.एकता सामाजिक शिक्षण संस्‍था, गडचिरोली

नागपूर

अनिकेत बहुउद्देशिय शिक्षण संस्था, नागपूर

वर्धा

श्री नामदेव महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वर्धा

चंद्रपूर

सर्वोदय युवा विकास संस्था, ता.चिमूर, चंद्रपूर

भंडारा

भारतीय औषधी अनुसंधान संस्था, भंडारा

संस्थानिहाय उपलब्ध करुन देण्यात येणा-या सेवाः-
प्रकल्प भागातील १ ते ३० वयोगटातील लोकांच्‍या चाचण्या करुन घेण्यासाठी प्राथमिक चाचणीची सोय प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये करुन देण्यात आलेली आहे.
प्राथमिक चाचणीमध्ये सकारात्मक आलेल्या व्यक्तींचे Confirmatory चाचणीची सोय म्हणजेच इलेक्ट्रोफोरेसीस चाचणीची सोय १०-१२ प्राथमिक आरोग्य केंद्रामागे एका ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे.अ.क्र.

आरोग्य संस्था

उपलब्ध करुन द्यायच्या सेवा

प्रा.आ. केंद्र

 1. मोफत सोल्युबिलीटी तपासणी
 2. समुपदेशन
 3. नियमित सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी
 4. प्रोफीलॅक्‍टीक व ल'क्षणानुसार उपचार
 5. सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांची माहिती अद्यावत ठेवणे.

ग्रा.रु.

 1. मोफत सोल्युबिलीटी तपासणी
 2. मोफत इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी (फक्त इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी केंद्रावर)
 3. समुपदेशन
 4. नियमित सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी
 1. प्रोफीलॅक्‍टीक व ल'क्षणानुसार उपचार
 1. रक्तपेढीवर सिकलसेल रुग्णांसाठी रक्त संक्रमणाची सुविधा
 2. सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांची माहिती अद्यावत ठेवणे.

३.

जि.रु.

 1. मोफत सोल्युबिलीटी तपासणी
 2. मोफत इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी
 3. समुपदेशन
 4. नियमित सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी
 5. वेदनानाशक औषधांचा पुरवठा
 6. रक्तपेढीवर सिकलसेल रुग्णांसाठी रक्त संक्रमणाची सुविधा
 7. सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांची माहिती अद्यावत ठेवणे.
 8. एच.पी.एल.सी. चाचणी केद्रांमध्‍ये मोफत एच.पी.एल.सी. चाचणीची सोय
 9. तज्ञ डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यासाठी टेलिमेडीसीन सुविधांचा वापर.

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय समाविष्ट आरोग्य संस्थाः-अ.क्र.

जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्रे

ग्रामीण रुग्णालय

जिल्हा रुग्णालय

स्त्री रुग्णालय

वैद्यकीय महाविद्यालये

इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी केंद्र

ठाणे

३३

पालघर

४६

१२

नाशिक

१०४

२८

नंदूरबार

५८

१४

अमरावती

५६

१३

गोंदिया

४०

११

गडचिरोली

४५

१२

नागपूर

४९

११

वर्धा

२७

१०

चंद्रपुर

५८

१३

११

भंडारा

३३

१२

यवतमाळ

६३

१७

१३

धुळे

४१

१४

जळगाव

७७

२०

१५

नांदेड

६५

१६

१६

वाशिम

२५

१७

अकोला

३०

१८

बुलडाणा

५२

१५

१९

औरंगाबाद

५०

१३

२०

रायगड

५२

१३

२१

हिंगोली  

२४

एकूण

१०२८

२५७

१५

८८

वर्षनिहाय भौतिक प्रगतीअ.क्र.

वर्ष

एकुण् सोल्युबिलीटी चाचणी

एकूण रुग्ण

एकूण वाहक

२०१०-११

११८२०५७

२८७२

२४००५

२०११-१२

३१२१२६३

३०५९

३७७८५

२०१२-२०१३

२१५५६६६

२०२५

२५२२३

२०१३-२०१४

३८४७४७९

२२५०

३२८८६

२०१४-२०१५  

३०६३५०५

२१९२

२८९८२

२०१५-२०१६

३७१५०७०

१९१६

२५६९५

२०१६-२०१७(एप्रिल २०१६ - मे २०१६)

१२९००८

१५५

१९९३

एकूण

१७७१९१९४

१५५१५

१८८५८४


Top  
© Copyright NRHM, Mumbai